4 Advantages of Roopada Oil Control peel in the care of Acne and pimples to maintain beautiful and bright skin-Rahul Phate.

तारुण्यपिटिका असे ज्याला म्हणतात ते म्हणजे acne आणि पिंपल्स. तरुण वयात पदार्पण करताना प्रेत्येकचं मुलं-मुलींना कधी ना कधी पिंपल्स येतातच. काहींना ते जास्त येतात तर काहींना कमी. फरक एवढाच. पण तारुण्यपिटिका म्हणजे पिंपल्स आल्या की प्रत्येकाचेच मन अस्वस्थ होते.

त्यातल्या त्यात जर कुणाला जास्त प्रमाणात पिंपल्स येत असतील तर मग विचारायलाच नको. तरुण वयात सगळ्यात जास्त फ्रस्ट्रेशन कशाचे येत असेल तर ते पिंपल्सचेच.

असे पिंपल्स आले की नेमके काय करावे? यालाही काही उत्तर नसते.

कुणी घरगुती उपाय सांगते, कुणी कॉस्मेटिकस तर कुणी डॉक्टर कडे जायला सांगते. पण आपण नेमके काय करावे? आपण घरच्या घरी चांगले research based कॉस्मेटिक जर वापरले तर त्याचा निश्चितच खूप चांगला फायदा होऊ शकतो.

पिंपल्स बद्दल त्यासाठी आपल्याला समजून घ्याल हवे. पिंपल्स साधारणपणे तारुण्यात पदार्पण करताना टीनएज मध्ये यायला सुरवात होते. आपल्या शरीरात जेव्हा हॉर्मोनल बदल व्हायला लागतात, तेव्हा हॉर्मोन्स च्या प्रभावामुळे आपल्या त्वचेचा तेलकटपणा वाढायला लागतो आणि त्याच वेळेला आपल्या त्वचेत खूप साऱ्या नवीन पेशी तयार व्हायला लागतात यामुळे, जुन्या मृत पेशी त्वचेवरून गाळून पडतात आणि आपली त्वचा सुंदर आणि सतेज दिसायला लागते.

परंतु, कधी कधी हा हॉर्मोन्सच्या प्रभाव थोडा जास्त होतो आणि परिणामी आपली त्वचा जरा जास्तच तेलकट व्हायला लागते. त्याच वेळी, ज्या त्वचेवर साठलेल्या जास्त प्रमाणातील मृत पेशी असतात, त्या त्वचेवरून निघून जाण्या ऐवजी तेलामुळे त्वचेवर चिटकून राहतात.

मग हे मृत पेशी आणि सेबम म्हणजे त्वचेतून येणारे तेल, यांचे मिश्रण ओपन पोर्स मध्ये अर्थात तैल ग्रंथींच्या नलिकेत जाऊन जमते, यालाच आपण व्हाईट हेड्स असे म्हणतो.

4 Advantages of Roopada Oil Control peel in the care of Acne and pimples to maintain beautiful and bright skin-Rahul Phate.

आणखीन एक महत्वाचे म्हणजे, आपल्या सेबम मधील सल्फरचे ऑक्सिडेशन होऊन ते काळे पडते आणि व्हाईट हेड्सचे बाहेरचे टोक काळे दिसायला लागते, यांनाच आपण मग ब्लॅक हेड्स असे म्हणतो.

पिंपल्स होण्याच्या मागची खरी कथा इथेच सुरु होते. पिंपल्स ज्या बॅक्टरीया मूळे होतात त्याला Propionibacterium acnes असे म्हणतात. या बॅक्टरीयाची विशेषता म्हणजे हा ऑक्सिजन विरहित वातावरणात जगू शकतो आणि ऑक्सिजन याला मारून टाकतो. आणखी एक, हा तेल खाऊन जगणारा बॅक्टरीया आहे आणि आपल्या त्वचेमध्ये तयार होणाऱ्या तेलावर हा वाढतो.

आता बघा या बॅक्टरीया साठी किती उत्कृष्ट वातावरण तयार झाले आहे ते. याला खायला इथे भरपूर तेल (सेबम) आहे आणि ब्लॅक-व्हाईट हेड्स मूळे तेल ग्रंथींची तोंड बंद झाल्यामुळे ऑक्सिजन आत जाऊ शकत नाही. यामुळे इथे इन्फेकशन वाढते आणि मग भरपूर पिंपल्स यायला लागतात.

हे सगळे कळल्यावर आपल्याला आता पिंपल्स कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जर यासाठी अँटिबायोटिक्स घेऊन ट्रीटमेंट घेतली, तर पिंपल्स बरे होतात, परंतु अँटिबायोटिक्स बंद केल्या नंतर पिंपल्स पुन्हा कधीही होऊ शकतात. असा जर विचार केला, तर पिम्पल्सची सुयोग्य कॉस्मेटिक काळजी घेणे हाच एक उत्तम मार्ग उरतो.

4 Advantages of Roopada Oil Control peel in the care of Acne and pimples to maintain beautiful and bright skin, A daily pack-Rahul Phate.

आणि म्हणून, पिम्पल्सची काळजी घेताना रूपदा ऑइल कंट्रोल पील एक वरदान ठरते. हिची ट्रीटमेंट नाही, ही केअर आहे. हा उपचार नव्हे ही उपरोक्त काळजी घेणे आहे.

आपण जर आपल्या त्वचेची सुयोग्य काळजी घेतली तर आपल्याला टेन्शन येणारच नाही.

मग नेमके काय करायला हवे?

तर रूपदा ऑइल कंट्रोल पील रोज किमान दोनदा चेहरा आणि मानेला लावायलाच पाहिजे.

आपल्या घरातील काही गोष्टी पिम्पल्सची काळजी घेण्यासाठी उपयुक्त असू शकतात का? तर याचं उत्तर संमिश्र असेल. नुसते घरातील पदार्थ पुरेसे नसतील, पण रूपदा ऑइल कंट्रोल पील बरोबर ते उपयुक्त असू शकतात.

अश्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या उपयुक्त ठरू शकतात? तर काकडी, गाजर, जायफळ, आंबेहळद आणि ज्येष्ठमध हे आपल्या घरातील पदार्थ पिम्पल्सची काळजी घेताना उपयुक्त ठरू शकतात. यातील जेही काही उपलब्ध असेल ते रूपदा ऑइल कंट्रोल पील बरोबर आपल्याला वापरता येऊ शकते.

रूपदा हे ऑइल कंट्रोल पील आहे. ते तेलकट त्वचेवरील ऑइल तर नियंत्रित करतेच, पण त्याचबरोबर त्वचेवरील मृत पेशी कमी करायलाही मदत करते.

Acne पिंपल्स असताना रूपदा कसे काम करते ते आपण समजून घेउ या! त्यासाठी आपण पहिले पिंपल्स येत असतानाचे मुख्य प्रॉब्लेम्स समजून घेऊ:

१. त्वचेतील तैल ग्रंथी अधिक उत्तेजित होतात आणि चेहरा अधिक तेलकट होतो.

२. कधी कधी मृत पेशी जास्त प्रमाणात त्वचेवर साठल्यामुळे तैल ग्रंथींची तोंडे बंद होतात आणि त्वचा बाहेरून कोरडी वाटते, परंतु ती आतून तेलकट असल्याने अश्या त्वचेला हिडन ऑईली स्किन असे म्हंटल्या जाते.

३, मृत पेशी त्वचेतील तेल पिऊन चिकट होतात आणि ओपन पोर्स मध्ये शिरून, ब्लॅक आणि व्हाईट हेड्स तयार होतात.

४. तैल ग्रंथींची तोंडे बंद झाल्याने आत ऑक्सिजन पोहचू शकत नाही आणि मग तिथे इन्फेकशन होते.

५. पिम्पल्सचा आकार मोठा असेल आणि ते फोडल्या गेले तर चेहऱ्यावर डाग आणि खड्डे तयार होतात.

4 Advantages of Roopada Oil Control peel in the care of Acne and pimples to maintain beautiful and bright skin, Acne care pack-Rahul Phate.

आता आपण पाहू की रूपदा इथे कसे काम करते.

१. रूपदा त्वचेवरील तेल शोषून घेते आणि त्वचेचा तेलकटपणा कमी करायला मदत करते.

२. रूपदा त्वचेवर चिकटणाऱ्या मृत पेशी त्वचेवरून काढून टाकायला मदत करते. यामुळे ब्लॅक आणि व्हाईट हेड्सची निर्मिती कमी होते.

३. रूपदा त्वचेचे pH पुन्हा पूर्ववत आणि थोडे ऍसिडिक म्हणजे ५.६ च्या जवळपास राखण्यास मदत करते, यामुळे त्वचेचे संरक्षण होते, आणि नवीन पिंपल्स तयार होण्याचे प्रमाण कमी होते.

४ त्वचेवरील टॅन आणि काळपटपणा कमी करण्यासही रूपदा अत्यंत उपयुक्त आहे.

आणि म्हणून, पिंपल्स आटोक्यात ठेऊन चेहरा सुंदर ठेवण्यासाठी रूपदा ऑइल कंट्रोल पीलचा वापर आपण दररोज दोनदा करायलाच हवा.

यासाठी १/२ चमचा रूपदा + १/२ चमचा Dermo De-Tox  पॅक + १/२ चमचा पाणी व्यवस्थित मिसळून घ्यावे. संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने दोन मिनिटे हलके घासावे. साधारण पाच मिनिटे हा पॅक चेहऱ्यावर लावून  ठेवावा, आणि पाण्याने चेहरा धुवून घ्यावा, चेहरा धुतल्यानंतर मऊ सुती कपड्याने घासून पुसावा. असे नियमित, सकाळ आणि संध्याकाळी करावे.

याचं निश्चितच आपल्याला फायदा होऊ शकतो.

घरातील काही पदार्थ या रूपदा पॅक बरोबर वापरता येऊ शकतात. असे काही मिसळून करावेच असे नाही, वरील पॅक पण आपल्याला छान परिणाम दाखवतो, पण आपल्याला आणखी चांगला परिणाम हवा असल्यास खालील गोष्टींचा वापर करता येईल.

१. १/२ चमचा रूपदा + १/२ चमचा Dermo De-Tox  पॅक + १/२ चमचा काकडीचा रस वापरल्यास त्वचेवरील डाग कमी व्हायला मदत होते.

२. वरील पॅक मध्ये काकडी ऐवजी गाजराचा रस वापरल्यास पिंपल्स लवकर आटोक्यात येतात.

३, वरील पॅक मध्ये १/४ चमचा आंबेहळद आणि एक चिमूट जायफळ पावडर वापरल्यास त्वचेवरील डाग आणि काळपटपणा तर कमी होतोच पण त्याबरोबर पिंपल्सचे इर्रिटेशन देखील कमी होते.

४. रूपदाच्या पॅक मध्ये १/४ चमचा जेयष्ठमध पावडर मिसळल्यास त्वचा उजळते आणि इन्फ्लाम्मेशन कमी होण्यासही मदत होते.

रोज सकाळ संध्याकाळ रूपदा आणि Dermo Detox पॅक नियमित वापरल्यास आपल्याला नक्कीच पिंपल्सचा सातत्याने होणार त्रास आटोक्यात आणता येईल. यामुळे पिंपल्सचे डाग, डार्कनेस आणि टॅनही कमी होण्यास मदत होते.

चेहऱ्याप्रमाणेच जर दंडांवर आणि पाठीवरही पिंपल्स असतील, तर रोज दोनदा हा पॅक पाठीवर आणि दंडावरही थोडा घासून लावावा. दहा मिनिटे ठेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.

तर, स्वतःच्या सौंदर्याची काळजी घेतांना जर पिंपल्स पासून सारंरक्षण हवे असेल तर रूपदा आणि Dermo Detox पॅक नियमित, दिवसातून दोनदा वापरायलाच हवा.

आणि जर पिंपल्सचे प्रमाण जास्तच असेल तर हाच पॅक दिवसातून तीन किंवा चारदा देखील वापरता येईल.

अतुलनीय समाधान आणि मोहक सौंदर्य पुन्हा प्रदान करणारा एकमेव पॅक म्हणजे रूपदा ऑइल कंट्रोल पील.

#Roopada #oilcontrolpeel #Acne #pimples #Acnemarks #tanning #darkface #Rahulphate #Detox #Skinbrightening #exfoliation #dailyskinpeel #Beautifulskin #Blackheads #whiteheads #Oilyskin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *